ह्या ब्लॉगसाईट मध्ये आपण शेतकर्यांना माती परीक्षण करताना आवश्यक असणारी सर्व माहिती जमा केली आहे . ज्याच्यामध्ये काही लोकांचे व्हिडीओज आहेत, माहिती आहे. mitti ke prakar देखील आम्ही ह्यामध्ये वर्णलेले आहेत. आमचा प्रामाणिक हेतु हाच आहे की माती परीक्षणाकरीता लागणारी एकत्रीत सर्व माहिती शेतकर्यांना येथुन मिळावी.

Column 1

Column 2

माती

माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात.नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत: ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात.मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत.
मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात.यातील सच्छिद्रता वायू व पाणी धरून ठेवते. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते. माती खूप उपयोगी असते . माती शिवाय कुठलाच झाड उगवू शकत नाही.
मृदा अवनती
मानवीय आणि नैर्सगिक घटकामुळे मृदा अवनती होते. जंगलतोड ,अतिचराई ,रासायनिक खते व किटकांचा अतिवापर ,भूस्खलन ,पूर इ.होय .
मृदा अवनती रोखण्यासाठी काही पद्धती
  • १.पाचरण
  • २.दगडी बांध
  • ३.टेरेस फार्मिंग
  • ५.आंतर पिके
  • ६.शेल्टर बेल्ट
मृदा वर्गीकरण :
१. गाळाची मुदा
२.काळी मृदा
३. तांबडी मृदा
४ .लॅटारेट मृदा
५.वन मृदा
६.शुष्क मृदा
SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Footer