ह्या ब्लॉगसाईट मध्ये आपण शेतकर्यांना माती परीक्षण करताना आवश्यक असणारी सर्व माहिती जमा केली आहे . ज्याच्यामध्ये काही लोकांचे व्हिडीओज आहेत, माहिती आहे. mitti ke prakar देखील आम्ही ह्यामध्ये वर्णलेले आहेत. आमचा प्रामाणिक हेतु हाच आहे की माती परीक्षणाकरीता लागणारी एकत्रीत सर्व माहिती शेतकर्यांना येथुन मिळावी.

Column 1

Column 2

शेत जमिनीत तलावातील गाळ

शेत जमिनीत तलावातील गाळ किती प्रमाणात वापरावा?
तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहे. गाळमातीच्या वापरामुळे हलक्‍या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता वाढविता येतेच, परंतु तिची ओलावा साठवण क्षमतासुद्धा पूर्ववत वाढविली जाते, तसेच अशा गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. तळावातील गाळमाती हलक्‍या ते मध्यम जमिनीत योग्य प्रमाणात मिसळावी. त्यामुळे तलावाची कमी झालेली पाणी साठवणक्षमता पूर्ववत ठेवली जाते. योग्य प्रमाणात गाळमातीच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण जादा दिसून आले. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शिफारशीत खत कमी करता येणे शक्‍य आहे.
शेतकरी तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्‍या जमिनीत सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात. गाळमाती टाकत असताना तिच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला जात नाही. ही गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात टाकली जाते. त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.

गाळमाती वापरताना घ्यावयाची काळजी -

गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्‍या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे.
* गाळमाती व शेत जमिनीतील चिकण मातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निर्धारित करावी. मार्च ते मे महिन्यात पाणी साठवण पद्धती कोरड्या पडतात, त्याच वेळी साठवण पद्धतीतून गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.
* गाळमातीचा जादा फायदा होण्यासाठी गाळमाती पसरलेल्या शेतात खरीप हंगामात सरी वरंबे करावेत. फळबाग लागवड करताना गाळमाती, खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेतात उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये भरावी.
* ज्या गाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आहे अशी गाळमाती शेतात पसरू नये. पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती खोदून शेतात पसरण्यासाठी वापरू नये.
* चांगल्या प्रतीची गाळमाती विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये. चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरविण्यासाठी वापरू नये.

संपर्क : 0217 - 2373047, 2373209
विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर
स्त्रोत: अग्रोवन-
SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Footer