ह्या ब्लॉगसाईट मध्ये आपण शेतकर्यांना माती परीक्षण करताना आवश्यक असणारी सर्व माहिती जमा केली आहे . ज्याच्यामध्ये काही लोकांचे व्हिडीओज आहेत, माहिती आहे. mitti ke prakar देखील आम्ही ह्यामध्ये वर्णलेले आहेत. आमचा प्रामाणिक हेतु हाच आहे की माती परीक्षणाकरीता लागणारी एकत्रीत सर्व माहिती शेतकर्यांना येथुन मिळावी.

Column 1

Column 2

कसं कराल माती आणि पाणी परिक्षण?

soil inispection details शेतीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच आणि पाण्याचं परीक्षण करणं हिताच ठरतं.
माती परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यातील पिकांना उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण शोधून काढणे. त्यानुसार निरनिराळ्या पिकावरील खताचं नियोजन करणं. जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणं, पिकांना दिली जाणारी खते प्रमाणशीर न दिल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही.
तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.त्यामुळे खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादनही वाढू शकते.
या माती परीक्षणासाठी शेतातून माती कशी घ्यावी याविषयी जाणून घेऊ यात.माती परीक्षणासाठी चालू असलेला उन्हाळ्याचा हंगाम हा उत्तम..करणं या काळात शेतात बहुतांश पिक ही निघून गेलेली असतात. मातीचा रंग, सुपिकता, खडकाळपणा, उंचसखलपणा आणि पाणथळपणा यावरून जमिनीचे वेगवेगळे विभाग पडतात. एक समान मगदुराच्या भागातून नागमोडी पद्धतीने १० ते १५ ठिकाणी नमुना घ्यावा.मातीचा नमुना हंगामी पिकाकरीता २० सेंटीमीटर खोलीवर तर उस, कापूस याकरिता ३० सेंटीमीटर खोलीवर जाऊन माती घ्यावी.
फळ पिकासाठी १०० सेंटी मीटर खोलवरचा मातीचा नमुना घ्यायला हवा. मातीचा नमुना घेण्यासाठी निवडलेल्या जागेवर इंग्रजी व्ही आकाराचा योग्य खोलीचा खड्डा करून तो व्यवस्थित मोकळा करावा.खड्ड्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासावी.ती स्वचः घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.                   
शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी.तिचे सारखे चार भाग वेगळे करावेत.समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग एकत्र पुन्हा मिसळून त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत अशा पद्धतीने शेवटी अर्धा किलो माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे.नंतर ही माती एका प्लास्टिक अथवा कापडी पिशवीत भरून त्यावर दिनांक,आपले नावं,पत्ता सर्वे नंबर टाकून तो जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात असणाऱ्या प्रयोगशाळेत परीक्षणासाठी द्यावा.
शेतात पाण्याच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर करतानाही काळजी घेतली पाहिजे.पाण्याविना दुष्काळ पडतो तर अति पाण्याने शेती बुडते हे ध्यानात घ्यायला हवे.पाणी हे सिंचना करिता योग्य कि अयोग्य आहे याची देखील तपासणी करून घेण फायद्याच ठरत.क्षारयुक्त पाण्याने जमीन खराब होउ नये आणि पर्यायाने उत्पादन क्षमता कमी होउ नये म्हणून आपण शेतीला वापरात असलेल्या पाण्याचा नमुना हा एका बंद बाटलीत घेऊन तो तपासणीकरिता देता येतो.
आपण ज्या शेतीतून पिढ्यानपिढ्या उत्पादन घेतो आहे.त्या शेतीच आरोग्य जपण हेही आपल कर्तव्य आहे.त्यामुळे जर या काळ्या  आईला दीर्घायुषी ठेवायचं असेल तर या अत्यंत महत्वाच्या अशा माती आणि पाणी परीक्षणाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही.
SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Footer